उस्मानाबाद ,दि.२३
पोलीस ठाणे, तामलवाडी: काविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकान वेळ निर्बंध इत्यादी मनाई आदेश जारी केले आहेत.
या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 21 जून रोजी तामलवाडी येथे 1)शौकत बेगडे यांनी चिकन दुकान 2)अमोल घोटकर यांनी सिंचन साहित्य विक्री दुकान 3)गोपाळ सुरवसे यांनी खत विक्री दुकान व्यवसायास चालू ठेवले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत तामलवाडी पो.ठा. येथे 3 गुन्हे नोंदवले आहेत.