तुळजापूर ,दि. २२ :
" जन्म दिनी वृक्ष लावू अंगणी "
वाढदिवस करताना तो नेहमी पर्यावरण पूर्वक आसला पाहिजे हा ध्यास मनी धरून समाजसेवक युवा नेते  दिनेश धन्यकुमार क्षिरसागर यांची पुतनी कु शाभंवी आनंद क्षिरसागर हिचा वाढदिवस केक, आतिषबाजी, जेवणावळी या सर्व गोष्टीना  फाटा देत वाढदिवस पर्यावरण पूरक करण्याचे ठरविले. त्या उद्देशाने 101 झाडे लावण्याचा संकल्प करून  मंगळवारी  प्रभाग क्र 2 विश्वास नगर मध्ये तिच्या 11 व्या वाढदिवसानिमित्त विश्वास नगर येथील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या हस्ते 11 झाडांचे वृक्षारोपण करून सुरुवात केली.


  
 येणाऱ्या प्रत्येक जेष्ठांचे एक झाड देऊन स्वागत केले. वृक्षारोपण करताना राजाभाऊ शिंदे,दिपक महामुनी, हणमंत दरेकर,प्रवीण नाडापुडे, राहुल साठे, सतीश दरेकर, आनंद क्षिरसागर, तम्मा वाघमारे, दत्तात्रय पटाडे, प्रा डॉ शिवाजी जेठीथोर, गोरख पवार, नितीन रोचकरी, दुर्गेश साळुंके,महेश चोपदार, तुकाराम मुळे,  विनायक नाईक आदी उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व मित्र परिवाराने सहकार्य केले.
 
Top