उस्मानाबाद  ,दि . 22  : 

सुंदर माझे कार्यालय अभियानातर्गत जिल्हा परिषदेमध्ये चालू असलेल्या कामकाजाची पाहणी करून  जिल्हाधिकारी कौस्तुभ  दिवेगावकर यांनी या कामकाजाबाबत आज येथे समाधान व्यक्त केले.


उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वच कार्यालयांमध्ये सुंदर माझे कार्यालय या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण, स्वच्छता, अभिलेख, रंगरंगोटी इत्यादी विविध प्रकारची कामे चालू आहेत. जिल्हा परिषदेनेही या उपक्रमात चांगल्या प्रकारे कामे केली आहेत. ही कामे जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन पहावीत ,  अशी जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर  यांना विनंती केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड, वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, नितीन दाताळ, आनंत कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे, कृषी अधिकारी चिमणशेटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमार नवाळे, शिक्षणाधिकारी गजानन सुसर, श्री मोहरे आदींच्या समवेत पाहणी केली. 


सर्वच कार्यालयांमध्ये सुंदर माझ्या कार्यालयांतर्गत कामकाज चालू असून त्यात आणखी भर कशी घालता येईल याबाबत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी काही सूचनाही केल्या. सर्व अधिकारी, कर्मचारी, लोक प्रतिनिधी यांच्या समन्वयाने जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या कामकाजाचे कौतुकही जिल्हाधिकारी श्री . दिवेगावकर यांनी यावेळी केले.
 
Top