तुळजापूर तालुक्यातील २१ टीएमसी एम.आय. डी .सी. सारख्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन
तुळजापूर, दि. २४ :डॉ.सतीश महामुनी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर या मान्यवरांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची महाआरती केल्यानंतर दुसऱ्या पर्वातील राष्ट्रवादी परिवार संवादाला तुळजापूर येथुन गुरुवार दि.२४ जुन रोजी पासुन प्रारंभ करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये चालवणाऱ्या राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व 2 याच्या उद्घाटन प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे , माजी केंद्रीय मंत्री जयसिंग गायकवाड ,राष्ट्रवादी पक्षाचे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, विद्यार्थी आघाडी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉ. सेल प्रदेशाध्यक्ष नरेंद्र काळे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवन गोरे, माजी आमदार राहुल मोटे, शिक्षणतज्ञ प्रतापसिंह पाटील, जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे, उद्योजक अशोक जगदाळे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील, विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे, शहराध्यक्ष अमर चोपदार, माजी नगराध्यक्ष गणेश कदम, युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे, विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख दुर्गेश साळुंके, युवक शहराध्यक्ष नितीन रोचकरी, युवक माजी तालुकाध्यक्ष महेश चोपदार, युवक नेते गणेश नन्नवरे, शरद जगदाळे, सचिन कदम ,गोरख पवार, दिनेश क्षीरसागर, सुभाष कदम, बबन गावडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी श्री तुळजाभवानी देवीच्या महाद्वार समोर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह इतर मान्यवरांनी तुळजाभवानी देवीची महाआरती केली. याप्रसंगी आई राजा उदे , उदे च्या जयघोषात परिसर दुमदुमून निघाला. तुळजाभवानी मंदिरापासून परिवार संवादाला सुरुवात झाली. त्यानंतर तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या सभागृहात उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांबरोबर प्रदेशाध्यक्ष यांनी संवाद साधला
विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे यांनी यावेळी तुळजाभवानी सहकारी साखर कारखाना सुरु करण्यासाठी पक्षाच्यावतीने प्रयत्न करावेत आणि मराठवाडा सिंचन योजनेसाठी पुरेसा निधी देऊन ते लवकरात लवकर पूर्ण करण्याची महत्त्वाची मागणी केली.
माजी युवक तालुकाध्यक्ष महेश चोपदार यांनी याच मागणीसाठी पक्ष कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीचे निवेदन प्रदेशाध्यक्षांना सादर केले. तुळजापूर तालुक्याचे अर्थकारण तुळजाभवानी मंदिर अवलंबून असल्यामुळे ते तातडीने भाविकांना खुले करावे अशी मागणी शहराध्यक्ष अमर चोपदार यांनी केले.
तुळजापूर विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसचे जनमत आहे. त्यामुळे या तालुक्याला विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देण्याचा विषय उपस्थित झाला . याशिवाय पक्षातून गेलेल्या लोकांना पक्षात घेण्याबाबत नकारात्मक भूमिका ठेवू नका, सर्वांना पक्षात न्याय मिळेल अशी चर्चा यावेळी जाहीरपणे करण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. ग्रामीण भागातून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहचे वातावरण होते. कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना तातडीने न्याय मिळावा अशी सर्वसाधारण अपेक्षा होती