तुळजापूर, दि .२४ :
हिंदू संस्कृतीमध्ये वट सावित्रीचे विशेष महत्त्व आहे . हे महत्त्व लक्षात घेऊन तुळजापूर येथील महिला भगिनींना माजी नगरसेवक विनोद गंगणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजय गंगणे यांच्या परिवाराच्या वतीने ७०० सुवासिनी महिलांना या सणाच्या निमित्ताने पितळी पंचपाळे भेट स्वरूपात देण्यात आली. तत्पूर्वी सर्व महिलांनी वड पूजन करून एकमेकीना शुभेच्छा दिल्या.
नगरपरिषद जुनी कन्या प्रशाला येथील वड पूजनासाठी आलेल्या समस्त महिला माता भगिनींना नगराध्यक्ष सौ. अर्चना विनोद गंगणे,
सौ.प्रियांका विजय गंगणे,सौ. निनोनी साळुंखे, सौ.वर्षा सुहास साळुंके, सौ.सुदर्शनी शिवाजी बोधले, सौ. सुषमा भोसले - मलबा , सौ.सविता अशोकराव गंगणे व गंगणे परिवाराकडून तब्बल ७००महिला भगिनींना पितळी पंचपाळ वडसवित्री पौर्णिमेनिमित्ताने भेट देण्यात आले.
या उपक्रमाबद्दल सहभागी झालेल्या महिलांनी या उपक्रमाचे कौतुक केले. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने हळदीकुंकवाच्या कामासाठी पंचपाळे उपयोगात आणले जाते. त्यामुळे या पवित्र दिनाच्या निमित्ताने मिळालेली ही भेट अमूल्य आहे अशा शब्दात आपल्या भावना महिलांनी व्यक्त केल्या.