तुळजापूर, दि. २४ : डॉ.सतीश महामुनी

भारतीय संस्कृतीमध्ये गोमातेचे खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, गोमातेचे संवर्धन झाले पाहिजे असे उद्गार  नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी काढले.


पंचगव्य निसर्गोपचार चिकित्सक संस्था,महाराष्ट्र राज्य संचलित गोवर्धन गोशाळेचे भूमिपूजन महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत व्यंकटअरण्य महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत ईच्छागिरी महाराज, नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगरसेवक सुनील रोचकरी, संजय सोनवणे,सुधीर परमेश्वर, सचिन परमेश्वर,सर्वोत्तम जेवळीकर, राहुल भोसले, शहाजी भांजी, सुदर्शन वाघमारे, विनायक माळी,महेश चोपदार या मान्यवरच्या हस्ते करण्यात आले.

नगराध्यक्ष  रोचकरी यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करीत या कार्यासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित महंत यांनी या कार्याला आशीर्वाद दिले.

यावेळी श्रीकांत तांबे,आकाश शिंदे, चेतन शिंदे,विकास सुरवसे, बालाजी पांचाळ,अभिषेक पवार, गोरक्षनाथ पवार,अनिल पवार,रोहित बागल, मेघराज बागल,गणेश भोसले,गोकुळ खडके,धन्यकुमार मस्के,जगदीश पलंगे, प्रशांत डोलारे,सिद्धराम कारभारी, दिनेश कापसे,दिनेश पलंगे ,दिनेश धनके,अभिषेक पवार,प्रवीण परमेश्वर, प्रतीक परमेश्वर, परीक्षित साळुंके,आदी धारकरी उपस्थित होते.
 
Top