संतोष बोबडे

तुळजापूर' दि ,८ : डॉ. सतीश महामुनी
सोमवारी रोजी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचे धोरण जाहीर केले. राज्य सरकारला देखील केंद्र सरकार  लस देणार आहेत अशी घोषणा केली. या घोषणेनंतर तुळजापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष बोबडे ,  युवक नेते माजी नगरसेवक विनोद गंगणे आणि निष्ठावंत भाजप नेते बाळासाहेब श्यामराज यांच्यासह इतर नेत्यांनी या घोषणेचे स्वागत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सायंकाळी देशाला उद्देशून संबोधन करताना कोरोना वरील लसीकरण संदर्भात अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. देशभरात लसीकरण 21 जून पासून वेगाने सुरू होईल 18 ते 44 या वयोगटातील तरुणांना देण्यात येणारी लस केंद्र सरकार मार्फत मोफत पुरवली जाईल.

 तसेच सर्व नागरिकांना ती मोफत मिळेल राज्य सरकारला देखील यासाठी खर्च करावा लागणार नाही अशी महत्त्वाची घोषणा केली. पंतप्रधान कोणती घोषणा करणार याकडे दिवसभर सर्वांचे लक्ष लागले होते.
मान्यवरांच्या प्रतिक्रिया 

भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे म्हणाले की लसीकरण होणार की नाही यासंदर्भात शंका-कुशंका होत्या लसीकरणाचा खर्च करण्यावरून जे वातावरण निर्माण झाले होते पंतप्रधानांच्या या गोष्टींमुळे हे वातावरण दूर होईल असे मत मांडले.


तुळजापूरचे युवक नेते विनोद गंगणे यांनी या गोष्टी नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य सरकारला दिलासा दिला आहे कर्तव्यभावनेने पंतप्रधान यांनी जनतेला मोफत लस देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे असे सांगितले.

भाजपचे  माजी जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब श्यामराज यानी प्रतिक्रिया देताना म्हणाले की सबका साथ सबका विकास हा नरेंद्र मोदी यांचा नारा आहे. गेल्या ७  वर्षांमध्ये केंद्र सरकारने व प्रधानमंत्री मोदी यांनी सामान्य माणसाच्या जगण्याला सुसह्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यातला एक निर्णय मोफत लसीकरण हा आहे आम्ही सर्व कार्यकर्ते या निर्णयाचे स्वागत करीत आहोत.
 
Top