उस्मानाबाद जिल्ह्यातील गोंधळी समाजाला अन्नधान्याचे किट देण्याचे नियोजन
तुळजापूर, दि. ४ : डॉ सतीश महामुनी
अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना उस्मानाबाद जिल्हाच्या वतीने गोंधळी समाजासाठी कोरोना काळात सर्व लॉक डाऊन असल्याने गोंधळी समाजातील गोर गरिबांसाठी किराणा किट (१५ वस्तू) साहित्य वाटप तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या खपकपटप
हस्ते करण्यात आले.
हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळुन करण्यात आला, तसेच अखिल भारतीय गोंधळी समाजाचे, कार्यक्रम प्रमुख पाहुणे म्हणुन राजेंद्र वनारसे , राष्ट्रीय कार्याध्यक्ष लातूर जिल्हा अध्यक्ष सुरेश ढवळे , जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष मनोज लोंढे, जिल्हा युवा अध्यक्ष श्रीकांत रसाळ, तालुका युवा उपाध्यक्ष रवि साळुंके, शहर संघटक हर्षवर्धन कांबळे हे उपस्थित होते.
तहसीलदार यांनी कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, प्रशासनाच्या सर्व योजना गरिबांसाठीच आहेत त्यासर्व योजनंचा लाभ गोंधळी समाजास मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहोत. मी गरीबीतून शिक्षण घेऊन तहसीलदार झालो, मला गरिबीची जाणीव आहे, अ.भा.गोंधळी संघटनाने जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम स्तुत्य व लोकोपयोगी आहे असे तहसिलदार सौदागर तांदळे यांनी व्यक्त केले .
जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ गायकवाड यांना आश्वासन दिले की गोंधळी समाजातील ज्या लोकांकडे रेशनकार्ड नाही, त्यांना रेशनकार्ड योग्य ती कार्यवाही करून देण्यात मिळावे अशी मागणी यावेळी केली . तुळजापूर शहर , जिल्ह्यातील गोंधळी समाजास किट वाटपाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. त्याची सुरुवात तुळजापूरातून करीत आहोत.अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यास युवा जिल्हा अध्यक्ष श्रीकांत रसाळ यांच्या मार्फत १२७ किराणा किटचे वाटप करण्यात आले. सदरचा किराणा अन्नधान्याचे किटचे वाटप संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामध्ये भूम, परंडा, वाशी या तीन तालुक्यास राजेंद्र गायकवाड यांच्या मार्फत वाटप करण्यात येणार आहे. उर्वरित, तालुक्यास प्रशांत खंकाळ यांच्या मार्फत किराणा किटचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवि साळुंके यांनी तर अविनाश भोरे यांनी आभार मानले .