तुळजापूर, दि. ४ : डॉ. सतीश महामुनी
श्री. तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने शहरातील व्यापारी , पुजारी तसेच सामान्य नागरिक मोठ्या आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहेत. या आपत्कालीन परिस्थितीमध्ये युवक नेते विनोद गंगणे यांनी स्वखर्चाने प्रभाग क्रमांक चार मधील ६०० कुटुंबांना अन्नधान्याची मदत केली आहे.
तुळजापूर शहर, प्रभाग क्रमांक.४ मंकावती गल्ली, खडकाळ गल्ली भागातील गरजु नागरिकांना आर्थिक अडचणी असल्याने व तुळजाभवानी मंदीर बंद असल्याने तुळजापूर शहरातील पुजारी वर्ग,छोटे व्यापारी यांची अडचण लक्षात घेऊन युवा नेते माजी नगरसेवक विनोद गंगणे यांच्या वतीने नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते गहु व तांदूळ बॅग वाटप करण्यात आले.
अडचणीत सापडलेल्या माझ्या जवळच्या माणसांना मी आज मदत करत आहे, भवानी मातेच्या आशीर्वादाने लवकरात लवकर ही परिस्थिती दूर होऊन सर्वांचे आरोग्य आणि जनजीवन सुरळीत व्हावे अशी अपेक्षा यावेळी युवा नेते विनोद गंगणे यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास सुहास सांळुके, शिवाजी बोधले, अभिजीत सांळुके, आनंद कंदले, गिरीश देवळालकर, माऊली भोसले, संजय सोंजी, राजाभाऊ मलबा, आप्पासाहेब बोधले, अमोल गायकवाड, चैतन शिंदे , अनंत छत्रे, खंडु छत्रे, अंबादास शिंदे, पवन सुर्यवंशी, अजय मस्के, सतीश कदम, शाम छत्रे, सुमित शिंदे, मधुसूदन गंगणे, प्रशांत गंगणे, मुन्ना शिंदे, ऋषीकेश सांळुके, , बाळासाहेब शिंदे, अनंत वराडे, सागर गंगणे, शांताराम पेंदे, रत्नदीप भोसले, श्रीधर काटकर, विनीत कोंडो, ॲड.गिरीश कुलकर्णी, पत्रकार संजय खुरूद, निलेश नाईकवाडी, विशाल गंगणे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, प्रशांत छत्रे, पंकज कदम, सज्जन शिंदे, महेश क्षीरसागर, बाळासाहेब नाईकवाडी, संतोष कदम, संजय सांळुके, दुर्गेश शिंदे, विनायक शिरसट आदी उपस्थित होते.
विनोद गंगणे यानी गोरगरीब लोकांना धार्मिक सण उत्सव आणि यासारख्या आपत्तीच्या काळात कुटुंब खर्चासाठी अनमोल मदत केलेले आहे. खऱ्या अर्थाने शहरासाठी आधारस्तंभ बनून त्यांचे कार्य सर्वांना अनुकरणीय असल्याचे नगराध्यक्ष सचिन रोचकरी यानी सांगितले.