उस्मानाबाद ,दि.२१
स्थानिक गुन्हे शाखा: जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरेवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 20 जून रोजी भूम शहरात छापा मारला. यात शहरातील सोनाली हॉटेलमध्ये 1)दिपक मुळे 2)सुदाम पौळ 3)धोंडीराम शेंडगे 4)राजेंद्र शाळु, सर्व रा. भुम 5)मधुकर सपकाळ 6)सुर्यकांत गायकवाड, दोघे रा. वारेवडगाव, ता. भुम हे सर्वजण तिरट मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 20,910 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा भुम पो.ठा. येथे नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, तुळजापूर: मयुर चंदनशिवे, उमेश झोंबाडे, रणजित पंडागळे, विनायक देडे, विनायक गरड, मेघराज साबळे, सर्व रा. काक्रंबा, ता. तुळजापूर हे सर्वजण दि. 20 जून रोजी मेघराज साबळे यांच्या शेतात एका झाडाखाली तिरट मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 5,990 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.