चिवरी,दि.१
 कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथे मंगळवार (दि१) पासून (दि३) पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायत च्या वतीने  घेण्यात आला आहे. चिवरी येथे दिवसेंदिवस कोरणा बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडत असून आतापर्यंत पन्नास रुग्ण बाधित झाले आहेत, याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत च्य वतीने ( दि३१)रोजी तीन दिवस कडकडीत बंद पाळून जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक  कामाशिवाय बाहेर पडुन नये आव्हाने ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे, 

जनता कर्फ्यूच्या पहिल्या दिवशी चिवरी ग्रामस्थांनी सर्व प्रशासनाच्या नियमाचे काटेकोरपणे  पालन करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, जनता कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील योगेश बिराजदार, ग्रामसेवक गोरोबा गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते राजीव कचवाई, आशा कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींनी पुढाकार घेतला आहे.
 
Top