तुळजापूर, दि. २४ :

विवेक विचार मंचच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने राज्यस्तरीय पहिला राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार विख्यात सामाजिक कार्यकर्ते ॲड.तेजराज लिंबाजी आवारे यांना ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते देण्यात येत आहे. 

औरंगाबाद येथे होणाऱ्या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. तेजराज आवारे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विवेक विचार मंच यांच्या वतीने आयोजित केलेल्या ( दि. २६ जुन ) सकाळी ११ वाजता राज्यस्तरीय ऑनलाईन सामाजिक न्याय परिषदेमध्ये पहिला छत्रपती राजर्षी शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्कार  देण्यात येत आहे.

या समारंभास ज्येष्ठ साहित्यिक ऋषिकेश कांबळे, अनुसूचित जाती आयोग  राष्ट्रीय अध्यक्ष विजय सांपला, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, प्राचार्य माया गायकवाड नागपूर, प्राचार्य लता मोरे नंदुरबार हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ऑनलाइन पद्धतीने दलित, आदिवासी, आणि वंचित घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचार या विषयाच्या अनुषंगाने या परिषदेमध्ये विचारमंथन केले जाणार आहे. याशिवाय कोरोना आपत्तीच्या काळामध्ये दलित, आदिवासी ,वंचित घटकावर आलेल्या संकटा मधून करावयाच्या उपाययोजना अशा महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे. या चर्चेद्वारे धोरणात्मक निर्णय घेऊन सदर निर्णय शासनासमोर सादर करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये वंचित घटकांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या पन्नास संस्था आणि संघटना यांनी विवेक विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने या परिषदेचे आयोजन केलेले आहे.
 
Top