काटी , दि.२४ :
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील रहिवासी तथा सेवानिवृत्त शिक्षक कै. किसन दिगंबर कुलकर्णी (के.डी.गुरुजी) यांच्या स्मृतीपित्यार्थ त्यांचे चिरंजीव उद्योजक तथा जयश्री कन्स्ट्रक्शनचे मालक दत्तप्रसाद कुलकर्णी (काटीकर ) यांच्या वतीने बुधवार दि. 23 रोजी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून लॉकडाऊन काळात उपजिविकेचे कुठलेही साधन नसलेल्या सोलापुरातील ब्राम्हण समाजातील पौरोहित्य व क्रियाकर्म करणाऱ्या 21 कुटुंबियांना तसेच बांधकाम क्षेत्रातील कामगार वर्गाच्या 21 कुटुंबियांना उपस्थित प्रमुख पाहुणे क्रिडा संघटक रविंद्र नाशिककर, रोटरी क्लबचे सचिव श्रीशैल्य लातुरे, प्रमोद कुलकर्णी, यश कुलकर्णी, दत्तप्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते शासकीय नियमांचे पालन करीत सामाजिक अंतर ठेवून दहा दिवस पुरेल एवढे गहु, तांदुळ,साखर,गोडेतेल तुरदाळ असे किराणा साहित्याच्या किटचे व मास्कचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी कै. के.डी. कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लॉकडाऊनच्या काळात गरजु, गोरगरीब, उपजीविकेचे कुठलेही साधन नसलेल्या ब्राह्मण समाजातील पौरोहित्य व क्रियाकर्म करणाऱ्या तसेच बांधकाम क्षेत्रातील गरजू कामगारांची मदत करणे हिच आमची समाजसेवा असल्याचे मत दत्तप्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. तसेच यापुर्वीही कोरोना काळात सुप्रभात ग्रुपच्या माध्यमातून गरजु, असह्य लोकांना दुपारचे जेवण दिल्याचे सांगून यापुढे ब्राह्मण वर्गाला शासकीय सोयी सुविधा मिळविण्यासाठी संघटीत होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी प्रमुख पाहुणे क्रीडा संघटक रविंद्र नाशिककर यांनी कुलकर्णी यांच्या कार्याचे कौतुक केले.
याप्रसंगी क्रिडा संघटक रविंद्र नाशिककर, रोटरी क्लबचे सचिव श्रीशैल्य लातुरे, दत्तप्रसाद कुलकर्णी, प्रमोद कुलकर्णी, यश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.