उस्मानाबाद,दि.11:

माध्यमिक व उच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस बसणाऱ्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत क्रीडा आयुक्तांनी सूचित केले असून विद्यार्थ्यांनी त्वरित प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले आहे.


कोविड-19 च्या प्रादुर्भामुळे  सन 2020-21 या वर्षात माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वीसाठी इयत्ता 8 वी व 9 वीमध्ये शिकत असताना खेळाडूंचा विविध स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येईल. तसेच 12 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या  (खेळाडू) विद्यार्थ्यांच्या बाबतीत इयत्ता 11 वीमध्ये  असताना विविध स्तरावरील स्पर्धेतील घेतलेला सहभाग विचारात घेवून सन 2020-21 मध्ये क्रीडागुणांची सवलत देण्यात येणार आहे.

 

जिल्ह्यातील पात्र खेळाडू विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. शिक्षण मंडळाचा  क्रीडा सवलत गुणासाठी असलेला जुनाच नमुना वापरुन परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,उस्मानाबाद येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन श्रीमती बिले यांनी केले आहे.

 
Top