तुळजापूर , दि. २७ :
आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने मोठ्य उत्साहात साजरी करण्यात आली.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त रिपाइं च्यावतीने तुळजापूर येथील डॉ.बाबासाहेब अंबेडकर चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी रिपाइंचे प्रमुख सल्लागार तानाजी उमाजी कदम, राहुल सोनवणे व विशाल शिंदे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून आभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम, तुळजापूर शहरअध्यक्ष अरुण कदम, तुळजापूर विधनसभा अध्यक्ष प्रकाश कदम, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुभाष कदम, बी. आर. एस.पी.चे अरुण कदम, वंचित अघाडीचे धम्मशील कदम, प्रताप कदम, हणमंत सोनवणे,तानाजी डावरे, माटे मिस्त्री,बालु कदम आदीसह कार्यकर्ते उपस्तिथ होते.
छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधुन तुळजापूर पोलिस ठाणे येथे नव्याने रुजू झालेले पोलिस निरिक्षक अजिनाथ काशिद यांचे तानाजी कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.