नळदुर्ग, दि.   २६ :   

तुळजापूर तालुक्यातील शिरगापूर गावात दारुबंदी करण्याबाबत एकल महिला मंडळाच्यावतीने नळदुर्ग पोलिस ठाण्यात सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या २५ ते ३०  महिलाच्या स्वाक्षरीने खुलेआम अवैध दारु ,शिंदी व्यवसाया सुरु असुन याप्रकरणी  दारुबंदी करण्याची  लेखी अर्ज शुक्रवार दि. 25 जुन रोजी  दिले.


 शिरगापूर ता.तुळजापूर येथे  सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या  सदस्याची  गावात   बैठक  संपन्न झाली. कोरोनामुळे सर्वञ आडचणीत वाढ   झालेली आहे.त्याचबरोबर  महागाई  वाढल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. त्यातच गावातील  अवैध दारु व्यवसायामुळे  महालाना ञास सहन कारावा लागत आहे. 


 दरम्यान   महिला मंडळाचा गावातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे  गावात खुले आम बेकायदेशिर  दारू विक्रीने महिलाना त्याचा सर्वाधिक ञास सहन करावा लागत असुन  दारू पिऊन पुरुष हिंसा करतात .  या अत्याचाराला कंटाळून महिलांनी अवैध दारू बंद करण्याचा निर्णय घेतला.  शुक्रवार रोजी  कायदेशीर कारवाईचा  निर्णय घेऊन २५ ते ३० महिलानी  नळदुर्ग पोलीस ठाणे गाठले. महिलांनी लेटर पॅडवर पोलिसाना तक्रार  देवुन  दारूबंदी करण्याची विनंती केली .  

पोलिसांनी तत्परता  दाखवून तात्काळ कार्यवाही करण्यासाठी पुढाकार घेतला. गावात जाऊन माञ एका विरुध्द कारवाई केली.   

याप्रकरणी  तात्काळ एकास अटक करण्यात आली. या सर्व घटनेमध्ये  सावित्रीबाई महिला मंडळाच्या अज्ञान बनसोडे, मीरा गायकवाड, शुभांगी जाधव,अंजना जाधव,नागिनी पवार.व महिला मंडळाच्या  महिला सदस्यानी पुढाकार घेतले. 


सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने तुळजापूर  तालुक्यातील शिरगापूर आणि चव्हाणवाडी या गावातील शिंदी आणि दारु  बंद व्हावी. दारुमुळे महिलांवर अत्याचार होत आहेत. त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बिघडत आहेत. दारुमुळे महिलाना मारहाणा होत आहे. त्यांना या अत्याचाराला सामोरे जावे लागत आहे. म्हणून दारु बंदी होणे आत्यंत आवश्यक आहे.असे निवेदन पोलिसाना दिले.

पोलिसानी केली थातुरमातुर  कारवाई

 अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग  पो.ठा. च्या पथकाने दि. 25 जून रोजी शिरगापुर गावात  छापा टाकला असता  लक्ष्मण चिंचोले  हे आपल्या घरासमोर 22 लिटर शिंदी व 5 लिटर गावठी  दारु अवैधपणे  बाळगलेले आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
Top