नळदुर्ग,दि.७: एस.के.गायकवाड:
 महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतील आरक्षणला  जि.आर.काढून स्थगिती दिली आहे. 


सदर बाबा ही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय कारक आहे. त्यामुळे नळदुर्ग येथे  रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या वतीने आघाडी सरकारचा जहीर निषेध करून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीचे निवेदन शासनाचे प्रतिनिधी म्हणून नळदुर्ग येथील पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मु.म.शहा याना देण्यात आले.


रिपाइंच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सरचिटणीस तानाजी कदम,जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, नळदुर्ग शहर कार्याध्यक्ष महादेव कांबळे, रिपाइंचे तालुका सरचिटणीस केतन  कदम,रिपाइं आल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद कुरेशी, तुळजापूर युवा आघाडीचे शहराध्यक्ष अमोल कदम, अनिकेत सोनवणे, आभिजीत सोनवणे,तात्या कदम,बंटी कदम,विशाल सोनवणे,  नामदेव बनसोडे, प्रताप कदम, सामाजिक कार्यकर्ते मारूती बनसोडे आदीसह अन्य  कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
 
Top