तुळजापूर, दि. २८ : डॉ. सतीश महामुनी

कोरोना संसर्ग परिस्थितीमध्ये जेव्हा संचारबंदीची परिस्थिती होती आणि संपूर्ण तुळजापूर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने बंद होते. तेव्हा मटका जुगार आणि हातभट्टी सारखे अवैध व्यवसाय सुरू राहिल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख राज तिलक रोशन यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनची साफसफाई केल्याचे वृत्त आहे .



याप्रकरणी चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या करून जिल्हा पोलीस प्रमुख यांनी आपल्या कार्यपद्धतीचा हिसका दाखवला आहे.

तीर्थ क्षेत्र  तुळजापूर शहरामध्ये मटका जुगार आणि हातभट्टी व्यवसाय राजरोसपणे सुरू असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या निदर्शनास आले आहे. या प्रकरणी त्यांनी सखोल चौकशी केली असल्याचे वृत्त समजते. यावरूनच जिल्हा पोलीस प्रमुख यांनी येथील चार कर्मचाऱ्यांच्या इतरत्र बदली करण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा आहे.


जिल्हा पोलिस प्रशासनाने येथील चक्रधर पाटील यांना आंबी येथे पाठवले आहे. अमोल कलशेट्टी यांना शिराढोण पोलीस ठाण्यात रुजू केले आहे. महादेव पाटील हे मुरूम तर कर्णराज राव यांची भूम येथे बदली केली आहे.

तुळजापूर तीर्थक्षेत्र येथे पोलीस प्रशासनावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताची जबाबदारी असते तुळजाभवानी मंदिर आणि गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी तसेच शहरातील इतर प्रमुख ठिकाणी पोलिस बंदोबस्त करावा लागतो. हा ताण लक्षात घेता सातत्याने जिल्हा पोलीस प्रमुख यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनकडे तीर्थ क्षेत्रातील पोलीस ठाणे म्हणून पाहिले आहेत. त्या अनुषंगाने सर्व सवलती देखील दिल्या जातात. येथील पोलीस संकुल तुळजापूर विकास प्राधिकरणाचे मधून उभे करण्यात आले. एका बाजूला पोलिस कर्मचाऱ्यावर बंदोबस्ताचा ताण असताना दुसऱ्या बाजूला आणि पोलीस कर्मचारी वर्षानुवर्षे तुळजापूर येथेच असल्यामुळे अवैध व्यवसाय, प्रतिबंधात्मक कामामध्ये पोलीस प्रशासनाला गालबोट लावण्याचे काम केल्याचे आरोप होत असुन मोठ्या प्रतिष्ठेने शहरांमध्ये वावरतात ही बाब वर्षानुवर्षे निदर्शनास आली आहे . 

जिल्हा पोलीस प्रमुख राजतिलक रोशन यांनी पहिल्यांदाच तुळजापूर पोलीस स्टेशन मध्ये साफसफाई करून केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top