जळकोट, दि.११६ :
तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजी नगर शाळेस केंद्राचे केंद्रप्रमुख अरुण अंगुले यांनी दि.१५ रोजी भेट देऊन पटनोंदणी, वृक्षारोपण, शालेय परिसर स्वच्छता, वर्ग स्वच्छता, ५० टक्के शिक्षक उपस्थितीचे नियोजन, शाळा व्यवस्थापन समिती बैठक इतिवॄंत्तात, ऑनलाईन शिक्षणासाठीचे नियोजन , गतवर्षीचे निकालपत्रक पाहिले.
चालू शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या व १०० टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावे असे सुचित केले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय अंगुले, शकील मुलानी, तुकाराम कुंभार, परमेश्वर मडोळे, उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक डी. एस. रेणूके यांनी शालेय कामकाजाची माहिती दिली. सहशिक्षक दयानंद सोनवणे यांनी आभार मानले.