उस्मानाबाद ,दि .१६ :
उस्मानाबाद जिल्हा परिषद महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निलेश दिनेश नायगावकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दि. 14 जूनला संघटनेच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये विजय देशमुख यांनी निलेश नायगावकर यांचे नाव सूचित केले . त्यानुसार सर्वानुमते जिल्हा उपाध्यक्षपदी निलेश नायगावकर यांची निवड करण्यात आली.
या बैठकीचे प्रास्ताविक ऋषिकेश पिंपळे यांनी केले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप जाधव, उत्तरेश्वर उंबरे,प्रवीण खरसाडे,भाऊसाहेब गाडे, राहुल माने,विजय मेनकुदळे,फारूक पटेल, सचिन देवगिरे,मधुकर कांबळे, अंकुश पेठे,प्रदीप कुलकर्णी ,शरद मुंडे , नंदकुमार कदम,शैलेश ताटे, भास्कर कोल्हे, सचिन कुलकर्णी,भाऊसाहेब व्हरकटे,सुरेश कोळी, विनोद गायकवाड आदींनी निलेश नायगावकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.