काटी, दि.१७ :
 तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथील रहिवासी तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी सावंत यांच्या वतीने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना निवेदन देऊन निवेदनात तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (खुर्द) या गावातील विविध मागण्या करण्यात आल्या असून यामध्ये प्रामुख्याने पिंपळा (खुर्द) येथील मंजूर करण्यात आलेले व जमीन अधिग्रहण केलेल्या जागेवर महावितरणचे नवीन सब स्टेशन तात्काळ  चालू करावे, येथील भ्रष्टाचारी रेशन दुकानदार यांची प्राधिकारपत्र तात्काळ रद्द करण्यात यावे, व येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्यात यावा. 

तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काटी- सावरगाव- सुरतगाव-पिंपळा खुर्द- देवकुरळी या रस्त्याचे दुरुस्ती करण्याचे काम अंदाज पत्रकाप्रमाणे न करता निकृष्ट दर्जाचे झालेले असून याकामाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अन्यथा या निकृष्ट कामाबद्दल आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत, शंकर भगवान कदम, धनंजय जांबुवंत डांगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 
Top