जळकोट,दि.२४ : मेघराज किलजे 

येथून जवळच असलेल्या आयएसओ मानांकन  मानमोडी ता . तुळजापूर  येथे जिल्हा परिषद प्राथमिक  शालेय परिसरात वटपौर्णिमा हा सण गावातील माता- भगिनी  एकत्रित येऊन आनंदाने हा सण साजरा केला.

 
शाळेतील होतकरू मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक शाळेत मागील वर्षी वृक्षारोपण करत असताना वडाच्या झाडाचे महत्व लक्ष्यात घेऊन व गावातील भगिनी खूप  भटकत जाऊन वड पाहून पूजा करत होते. हे शाळेचे मुख्याध्यापक  विक्रम पाचंगे व श्रीमती सुचिता चव्हाण यांनी निरीक्षण करून आपल्या भगिनी- माताचे हाल होऊ नये म्हणून शालेय परिसरात एक सुंदर वडाचे झाड लावण्यात आले . 


शाळेत मानमोडी गावातील भगिनी ग्रुप करून येऊन पूजा पाठ करत असताना पाहून शाळेतील शिक्षकांचे मन भरून आले .ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत -करत आपण समाजाचे घटक आहोत आणि समाजाचे हित समोर ठेऊन  मानमोडी शाळेत विविध उपक्रम राबवत आहेत . जेव्हा गावातील कॉलेज  विद्यार्थीनी  कु.अंकिता शिवाजी पवार या मुलीचे वटपौर्णिमा या सणाचे महत्व लक्ष्यात घेऊन शाळेचे प्राथमिक पदवीधर शिक्षक  रमेश दुधभाते  यांनी या विद्यार्थीनीची मुलाखात घेतली .एक सुंदर अशी मुलाखत आज पाहण्यात आणि ऐकण्यात मिळाली . या विद्यार्थीनीने शाळेतील मुख्याध्यापक  विक्रम पाचंगे व सर्व शिक्षक यांची स्तुती केली .मानमोडी गावात असे असंख्य विद्यार्थीनी शिक्षण घेऊन बाहेर पडत आहेत. 
 
Top