सलगरा, दि.२४ :

उस्मानाबाद जिल्ह्यामधे २३ जून रोजी ५८ लसीकरण केंद्रांवर १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले होते, या मध्ये १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना जिल्ह्यात कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यास सुरुवात झाली होती, त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सलगरा (दि.) प्राथमिक आरोग्य केंद्रात एकुण २०० नागरीकांना हि लस देण्यात आली होती.

यासाठी सकाळपासूनच १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांमध्ये लसीकरणासाठी उत्साह दिसून येत होता. योग्य ती खबरदारी तसेच कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, उपस्थित लाभार्थ्यांनी  कोविडच्या  मार्गदर्शक सूचनांचे पालन करत, लसीकरण करून घेतले.  

या  लसीकरणासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड, डॉ.अनिल वाघमारे, सुभाष शिंदे, प्रकाश रेड्डी, ए.बी. तिर्थकर, श्रीमती. रेनके, श्रीमती.भोसले, अनिता अंधारे, पुजा मिटकरी, एस.डी.भालेराव, कुणाल म्हस्के आदींनी परिश्रम घेतले.
 
Top