नळदुर्ग ,दि.२० :
रविवार दि.२० जुन रोजी भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष तथा तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथे कार्यकर्त्यांच्यावतीने विविध उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.
नळदुर्ग परिसरातील अकरा शेतकऱ्यांना विविध फळ झाडे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर श्री क्षेञ मैलारपूर (नळदुर्ग ) येथिल प्राचीन जुन्या खंडोबा देवस्थान मंदिराच्या जीर्णोद्धारराच्या कामासाठी अकरा पोते सिमेंट देण्यात आले. कोविड केद्रातील रुग्णाना अन्नदान करण्यात आले. त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
नळदुर्ग (आलियाबाद ) येथिल स्मशानभुमीत पुर्वी देवानंद रोचकरी यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या झाडांचे पुजन सुनिल चौधरी यानी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे नळदुर्ग शहराध्यक्ष पद्माकर घोडके , भाजयुमोचे शहराध्यक्ष श्रमिक पोतदार, भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते गोपाळ देशपांडे, धिमाजी घुगे , पञकार विलास येडगे , भाजपचे सदस्य तथा देवराज मिञ मंडाळाचे शहराध्यक्ष सुनील चौधरी, पिंटू गव्हाणे, रिया शेख, प्रशांत शहाणे, मल्हारी कोकरे, स्वप्नील जाधव, भिमाशंकर बताले आदीसह, भारतीय जनता पार्टी व देवराज मित्र मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.