जळकोट,दि.२६ :

 तुळजापूर तालुक्यातील जळकोट परिसरातील आयएसओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद मानमोडी शाळेस उमरगा गटशिक्षण कार्यालयातील विस्तार अधिकारी  बाळासाहेब महाबोले यांनी शाळेस भेट देऊन ई लर्निंग ,प्रोजेक्टर द्वारे अभ्यासक्रम, डिजिटल अभ्यासक्रम ,शाळेची संपूर्ण रंगरंगोटी ,शालेय रेकॉर्ड, कोरोना परिस्थितीत विद्यार्थ्यांची घेत असलेली काळजी तसेच परसबागेमध्ये फुलवलेली भाजीपाला बाग ,ड्रिप आणि तुषार सिंचनद्वारे  वंत ठेवलेले अनेक झाडे ,मैदानावरील अंथरलले पेवर ब्लॉक यांची पाहणी करुन माहिती जाणुन घेतली.

 शाळेस शुभेच्छा दिल्या तसेच कृतीयुक्त अभ्यासक्रम  झेल्या या विद्यार्थ्यांची शिक्षणाबद्दलची गाथा हुबेहूब नाटिका सादर केली . 
त्यांनी  उपक्रम पाहून  कौतुक केले. यावेळी त्यांच्या हस्ते बदाम या वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. 

यावेळी  शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष  संदीपान  गुंजकर ,उपाध्यक्ष सौ. शुभांगी सुरवसे ,मुख्याध्यापक  विक्रम पाचंगे,  रमेश दूधभाते  यावेळी उपस्थित होते.
 
Top