तुळजापूर, दि .२६ :डॉ. सतीश महामुनी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आघाडी सरकार निष्क्रिय सरकार ठरले असून मराठा आणि ओबीसी समाजाचे या सरकारने प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. यावरून राज्यातील जनतेचा तीव्र संताप या सरकारविरोधात निर्माण झाले आहे. असे उदगार तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मराठवाड्याच्या प्रवेशद्वार असलेल्या तामलवाडी ता.तुळजापूर येथे झालेल्या चक्काजाम आंदोलनात काढले.
राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तामलवाडी येथील टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. मराठवाड्याचे प्रवेशद्वार असणाऱ्या तामलवाडी येथे आमदार पाटील यांनी आंदोलनाचा किल्ला लढवला आणि या सरकारवर कडाडून टीका केली.
यावेळी आमदार पाटील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीचा खरपूस समाचार घेताना मागास आयोग व ईपेरिकेल डाटा काकडी न्यायला सादर करावा आणि ओबीसीचे घालवलेले आरक्षण तात्काळ मिळवून द्यावे, अन्यथा ओबीसी समाज या सरकारला स्वस्थ बसू देणार नाही असा इशाराही दिला.
यानिमित्ताने भाजपाचे माजी जिल्हा कोषाध्यक्ष बाळासाहेब शामराज यांनी यापूर्वीच्या देवेंद्र फडणीस यांच्या कार्यकाळात आरक्षणाच्या विषयावर सरकारने केलेले काम मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाया घालवले आणि ओबीसी समाजाला वाऱ्यावर सोडले अशी टीका केली.
यावेळी ओबीसी जिल्हाध्यक्ष विजय शिंगाडे, आदेश कोळी,गुलचंद व्यवहारे,इंद्रजित साळुंके,साहेबराव घुगे,प्रभाकर मुळे, गणेश सोनटक्के यांची भाषणे झाली. मराठवाड्याच्या सीमेवर उभे राहून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी या सरकारविरोधात घोषणाबाजी केली आणि जोरदार चक्काजाम केला.
याप्रसंगी भाजप तुळजापूर तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, विक्रम देशमुख,नारायण नन्नवरे, दत्ता राजमाने, वसंत वडगावे, ओबीसी तालुकाध्यक्ष फिरोज मुजावर, शरद जमदाडे,भिवा इंगोले, अण्णा लोंढे,आनंद कंदले,बापू कणे, शिवाजी बोधले,सुहास साळुंके,सुशांत भूमकर, अरविंद पाटील,महादेव पाटील, अण्णा सरडे, बाबा बेटकर, दत्ता शिंदे,उपस्थित होते. यावेळी आभार आनंद कंदले यांनी मानले.