कळंब, दि.२१ : सलमान मुल्ला
पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या अकार्यक्षमतेमुळे शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याबाबतचे निवेदन भाजपाचे कळंब तालुका अध्यक्ष प्रशांत लोमटेसह कार्यकर्त्यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कळंब यांना देण्यात आले आहे.
राज्याचे गृहराज्य मंञी जयंत पाटील , पोलिस महानिरीक्षीक औरंगाबाद परिक्षेञ, उस्मानाबाद पोलिस आधिक्षक आदिना पाठविलेल्या निवेदनात पुढे नमुद केले आहे की,
कळंब पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे, गुन्हेगारी, गांजा तस्करी, खून, फसवणूक यासारखे गुन्हे दररोज घडत असल्याचे आरोप करुन कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी 2019 साली निरीक्षकपदी पदभार स्वीकारल्याच्या अवघ्या काही महिन्यातच कळंब शहराच्या मध्यवर्ती चौकात दोन गटात तलवार, कोयता, कुऱ्हाडीने मारहाण झाली. इतकेच नव्हे तर भर चौकात गोळीबार झाला, ज्यामध्ये काहीजण गंभीर जखमी झाल्याचे म्हटले आहे.
मागच्या दोन वर्षात अवैध वाळू वाहतूक, पत्त्यांचे क्लब, मटका बुकी, जुगार, सुरट यासारखे अवैध धंदे सर्रासपणे सुरू नमुद करुन यावर कसल्याही प्रकारचे कळंब पोलिसांचे वचक नाही. अवैध धंद्यातून शहरात गुन्हेगारी वाढत असुन बनावट दारूचे गुत्ते देखील शहरात उघडपणे सुरू सांगितले आहे.
त्याचबरोबर शहरात गुटख्याचे ट्रकच्या ट्रक दाखल होत आहेत, हे कुणाच्या आशीर्वादाने दाखल होत आहेत असा प्रश्न उपस्थित कडक लॉकडाऊनमध्ये गेल्यावर्षी वाकडी गावात हजारोच्या संख्येत लोक जमा होऊन कोणाच्या सहकार्याने कार्यक्रम पार पाडले , याची देखील चौकशी उच्चस्तरीय समिती मार्फत चौकशीची मागणी केली आहे.
पोलीस ठाण्याच्या अंतर्गत आत्तापर्यंत असंख्य चोऱ्या, दरोडे घालण्यात आले. यातील किती आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले, हा देखील मोठा प्रश्न आहे. मागच्या काही वर्षांपासून शहरात मोटारसायकल चोरी करणारी टोळी सक्रिय होती, याचा देखील नुकताच पर्दाफाश झाला.
याच महिन्यात चोरीच्या उद्देशाने शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या मार्केट यार्डच्या आडत दुकानातील वॉचमनची गोळी झाडून हत्या करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्ह्याचा छळा लावला. 12 आरोपी मार्केट यार्डमध्ये पार्टी करून चोरीची योजना आखून नंतर खून करतात, तोपर्यंत कळंब पोलीस काय करत होते? असा सवाल करुन पोलीस स्टेशन हद्दीत तब्बल सव्वा कोटींचा गांजा पकडण्यात उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. इतका मोठा गांजा साठा आला कुठून? कळंब पोलिसांच्या नाकावर टिच्चून शेतात इतका मोठा साठा ठेवण्यात आला तरी पोलिसांना त्याची भनक सुद्धा लागली नाही. हे देखील पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या अकार्यक्षमपणाचे उदाहरण निवेदनात म्हटले आहे.
त्या भागातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखणे हे पोलिसांचे कर्तव्य असते. मात्र मागच्या दोन वर्षांमध्ये कळंब पोलीस स्टेशन हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा बट्ट्याबोळ झालेला पाहायला मिळाला. चोरी, दरोडा, खून, गांजा तस्करी, गुन्हेगारी, दोन गटात मारामारी, अवैध वाळू वाहतूक, मटका, जुगार, सुरर्ट, बनावट दारू विक्री, हफ्तेखोरी,गुटखविक्री हे सगळं सर्रासपणे सुरू आहे.हे सगळं पोलिसांचा अभय असल्याशिवाय सुरू राहू शकत नाही,अशी देखील चर्चा शहरात चर्चा आहे. त्यामुळे अशा अकार्यक्षम पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करवी अन्यथा कारवाई न झाल्यास सनदशीर मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला निवेदनकर्त्यानी दिला आहे.
या निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रशांत लोमटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रोहित कोमटवार,अरुण चौधरी,संतोष कस्पटे,नागनाथ घुले,संदीप बाविकर, माणिक बोंदर,संजय जाधवर,मिनाज शेख,मतीन पटेल,सतपाल बनसोडे, रामकिसन कोकाटे,नारायण टेकाळे, मकरंद पाटील, शिवाजी गिड्डे,गोविंद चौधरी,अमर बारकुल,सचिन बारकुल, शिवाजी शेंडगे,संताजी विर,राजाराम अंबिरकर, अनंत बोराडे,मनोज पांचाळ, अण्णासाहेब शिंदे,विशाल ठोंबरे, बाबुराव शेंडगे,सुधीर बिक्कड,परशुराम देशमाने,बापू माने, जिव्हेश्वर कुचेकर,इम्रान मुल्ला,सोनू कवडे, यशवंत रितापुरे धम्मा वाघमारे, ज्योतिबा नवले,व सर्व भारतीय जनता युवा मोर्चा व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.