तुळजापूर , दि.२१: राजगुरू साखरे
मागील दीड वर्षापासून जगभर थैमान घातलेल्या कोरोना महामारी मुळे गेल्या वर्षीच्या शैक्षणिक वर्षाचे नुस्कान झाले आहे, नुकताच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचे प्राथमिक धडे ऑनलाइन व्हावे लागले होते . तर शैक्षणिक वर्ष संपत असताना कोरोनाची दुसरी लाट आली
आगामी काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे यावर्षी शाळा सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे यावर्षी ' अ आ इ ई' आँनलाईनच शिकण्याची वेळ विद्यार्थीवर येण्याची शक्यता आहे.पंरतु समाजातील उपेक्षित वंचित कष्टकरी व असंघटित कामगार घटकातील व्यक्तीच्या आपल्याकडे डिजिटल शिक्षण देणारी साधने उपलब्ध नसतात, यामुळे ती शिक्षणापासून वंचित राहिले जात आहे. त्यासाठी शासनाने अशा उपेक्षित, आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील मुलांसाठी टॅब, मोबाईल अशी ऑनलाइन शिक्षण देणारी साधने उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
त्याच बरोबर या वर्षी कोरूना च्या तिसर्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचे तज्ञाकडून वर्तवली जात आहे, त्यामुळे यंदाही प्राथमिक शिक्षणाचा श्री गणेशा घरातच ऑनलाईनद्वारे घरातच होणार असल्याचे संकेत दिसू लागली आहेत. मागील दीड वर्षापासून जगभर पुरूना नेते मंडळी असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून शाळा बंद केल्या होत्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले होते, मात्र त्या माध्यमाचे शिक्षण विद्यार्थी पालक शिक्षक यांना ही कंटाळवाणी वाटू लागले आहे.
विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मात्र तरी ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याने महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था परिषदेच्या वतीने ऑनलाईन शिक्षणासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यातून बऱ्याच विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होत आहे. यंदाही मागील वर्षापेक्षा अधिक प्रभावीपणे शिक्षण उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे, कोरूना च्या तिसर्या लाटेत शाळेतील मुलांना जास्त बाधा पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे, त्यामुळे यंदाही विद्यार्थ्याचा श्री गणेशा ऑनलाईनच होणार असल्याचे दिसून येत आहे .