उस्मानाबाद , दि.२७ :
पोलीस ठाणे, कळंब : कळंब येथील भारत फायनान्स शाखेचे प्रतिनिधी अमोल कदम रा.कौडगांव ता.उस्मानाबाद यांनी मार्च 2020 ते ऑक्टोबर 2020 या काळात महिला बचत गटांकडुन मासीक हप्ते गोळा केले . तसेच महिला बचत गटांना कर्ज देण्याच्या बहान्याने कर्ज फी पोटी रकमा घेतल्या. अशा प्रकारे कदम यांनी एकुण 6,91,026 रुपये गोळा करुन भारत फायनान्स मध्ये न भरता अपहार केला.
अशा मजकुराच्या व्यवस्थापक आकाश गाढवे यांनी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 409 अंतर्गत गुन्हा नोदंविला आहे.