लोहारा, दि.१२ :
 लोहारा येथे भाजपा ओबीसी मोर्चाची शुक्रवार  रोजी  ओबीसी आरक्षणासंबंधी  येथील भाजपा कार्यालयात भाजपा ओबीसी मोर्चाची ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरक्षण  सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर  ओबीसी मोर्चाची बैठक संपन्न झाली. 


ओबीसी आरक्षण पुन्हा मिळावे यासाठी पुढील दिशा ठरविण्याबाबत व पुन्हा स्थापित करण्यासाठी पदाधीका-यांना ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष  विजय शिंगाडे यांनी मार्गदर्शन केले .यावेळी राजेंद्र पाटील   भाजपा तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे,  विजय महानूर ,ओबीसी जिल्हा चिटणीस  सुधाकर दंडुगुले, भाजपा ओबीसी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार   भाजपा माजी तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण ओबीसी  कार्यकारिणी सदस्य   इक्बाल मुल्ला ,भाजपा तालुका सरचिटणीस  शिवाजी दंडुगुले भटक्या विमुक्त तालुकाध्यक्ष मल्लिनाथ फावडे ,व्यापारी तालुकाध्यक्ष  नागनाथ लोहार, भाजपा ओबीसी माजी तालुकाध्यक्ष  रवी  कारभारी '  बाळासाहेब चव्हाण ,बालाजी दंडुगुले , सुनील  ठेले 'पंडित लोहार' राजू स्वामी  आदी ओबीसी समाज तसेच पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top