तुळजापूर दि २० : 

तुळजापूर तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस  तालुका सरचिटणीसपदी आरळी खुर्द येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष शिवाजीराव पारवे यांची निवड  करण्यात आली आहे.

 या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांनी ही निवड केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना संघटनेमध्ये काम करण्याची संधी देण्याच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर तालुक्यात आरळी खुर्द येथील सुभाष पारवे यांना तालुका सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे. या निवडीनंतर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील विधानसभा अध्यक्ष गोकुळ शिंदे तसेच तालुका युवक अध्यक्ष संदीप गंगणे , ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश नन्नवरे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
Top