उस्मानाबाद , दि. २ :

जिल्ह्यामध्ये दि. 3 जुलै रोजी 60 लसीकरण केंद्रावर 18 वर्ष वयावरील सर्व नागरिकांना (18-44 वर्ष वयोगटातील आणि 60 वर्षावरील असे दोन्ही वयोगटातील नागरीक) तसेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाइन वर्कर यांना कोविशिल्ड लसीचा डोस दिला जाणार आहे. 

लाभार्थ्यांनी लसीकरणाला जाताना आपले आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, मतदान कार्ड यापैकी ओळखपत्र सोबत बाळगावे. या केंद्रावर केवळ कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस (ज्या लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 84 दिवस पूर्ण झालेले आहेत. अशा लाभार्थ्यांना दुसरा डोस) दिला जाणार आहे.  


लसीकरण केंद्र ठिकाण
सर्व 44 प्राथमिक आरोग्य केंद्र (ग्रामीण भाग तालुकानिहाय)
उस्मानाबाद - येडशी, ढोकी, कोंड, जागजी, पाडोळी, पाटोदा, केशेगाव, पोहनेर, बेंबळी, समुद्रवाणी

तुळजापूर -  अणदुर, जळकोट, नळदुर्ग,सावरगाव, काटगाव, सलगरा दि, मंगरुळ तु.

उमरगा - मुळज, नाईचाकूर, येणेगुर, आलुर, डिग्गी

लोहारा -  कानेगाव, माकणी, जेवळी, आष्टा कासार

कळंब - शिराढोण, येरमाळा, मोहा, दहीफळ, इटकुर, मंगरुळ क  
वाशी - पारा, पारगाव,तेरखेडा
भुम - ईट, पाथरुड, माणकेशवर,  वालवड, आंभी
परंडा - आसू, आनाळा, जवळानी, शेळगाव , व  ग्रामिण रुग्णालय मुरुम, लोहारा, सास्तुर, तेर, वाशी, भुम, 
उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर, उमरगा, कळंब, परंडा, उपजिल्हा तुळजापूर अंतर्गत आराधवाडी सभागृह (तुळजाभवानी मंदिर प्रवेशव्दार) तुळजापूर, नागरि प्राथमिक आरोग्य केंद्र वैरागरोड, रामनगर उस्मानाबाद जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद, पोलिस रुग्णालय उस्मानाबाद, शासकिय आयुर्वेदिक रुग्णालय उस्मानाबाद इत्यादी. 

सर्व लसीकरण केंद्रावर लाभार्थ्यांना लस घेण्याकरिता ऑनलाईन नोंदणी आणि ऑन साईट (ऑनस्पॉट) नोंदणी या दोन्हीपण सुविधा उपलब्ध आहेत. दि. 2 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून ऑनलाईन बुकींग करण्याकरिता स्लॉट्स खुले करण्यात आलेले आहेत. ऑनलाईन नोंदणी करुन स्लॉट्स बुक केलेल्या नागरिकासाठी ऑनस्पॉट नोंदणी करुन लस घेण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांची स्वतंत्र रांगा ठेवण्यात आलेल्या आहेत.
 
Top