राजगुरु साखरे

 तुळजापूर : एकेकाळी लग्नसराई म्हटले की बाजारात धावपळ वर्दळ आणि सर्वत्र नुसता गल्लीचा मोहल असायचा, लग्न हा इतका धांदलीचा आणि आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असायचा की घाईच्या कोणत्याही गोष्टीला लग्नघाईची  उपमा दिली जायची. 

मात्र कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग चा नियम आल्याने लग्नातील  वराडी मंडळींची संख्या मर्यादित झाली. साहजिकच त्यामुळे या मंगल कार्य ठरलेल्या लग्न सोहळ्याचे पूर्ण स्वरूप बदलून गेले. यानिमित्ताने शाहिविवाह सोहळे लुप्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे. लग्न सोहळा म्हटली की महिनाभरापासून लगबग सुरू झालेली असते. शेकडो हात या सोहळ्याच्या तयारीत गुंतत असतात, यासाठी लाखो रुपयांचा खर्च केले जायचे आपापल्या आर्थिक कुवतीनुसार सोहळा कसा करता येईल या विवंचनेत वधू-वर पिते असायचे, अगदी रोजंदारीने कामावर जाणाऱ्याही साधा विवाह करावा म्हटला की किमान दीड ते दोन लाख रुपयांचा खर्च केला जायचा तर मध्यमवर्गीयांचा  हाच खर्च सरासरी चार लाखावर जायचा. 


परंतु कोरोनामुळे एकीकडे वधू-वर पित्याची मात्र चांगलीच बचत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बचत झालेल्या पैशातून त्यांच्या इतर आवश्यक गरजा पूर्ण करता येऊ लागल्या आहेत शिवाय कर्जबाजारीपणा थांबत असल्याचे स्पष्ट चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. तसेच एकेकाळी मेहंदी , हळदी, लग्न आणि इतर कार्यक्रम असा चार ते पाच दिवसाचा भरगच्च कसोटी मॅच सारखा प्रोग्राम असायचा. आता मात्र सकाळी साखरपुडा दहा वाजता हळदी आणि त्याच दिवशी दुपारी लग्न आणि सायंकाळी रिसेप्शनचे जेवण असावं वन डे मॅच सारखा  कार्यक्रम उरकला जात आहे. शिवाय ऋण काढून लग्न सण साजरा करण्याची पद्धत आणि एका दिवसाच्या लग्नसोहळ्यासाठी आयुष्यभर कर्जबाजारी होणारी वधू-वर पिता आता  आयुष्याभर कर्जबाजारी होणारे वधू वर पिता आता आयुष्यातील महत्त्वाचे कर्तव्य पार पाडताना आनंदायी दिसत आहेत.
 
Top