उस्मानाबाद , दि . २ :  

सरपंचांना अनेक समस्या आहेत, गावस्तरावर प्रत्येक अडीअडचणीत सरपंचांना तोंड द्यावे लागते, या सरपंच परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गावांची प्रतिनिधित्व केले जाणार आहे, आगामी काळात सरपंचांच्या मानधनाचा विषय विधानसभेत मांडून सरपंचांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत आमदार कैलास पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.


जिल्हा परिषद उस्मानाबाद यशवंतराव सभागृह मध्ये दि.1 जुलै रोजी सरपंच परिषद राज्यस्तरीय विस्तार मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत कृषीदिनी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील, धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. प्रतापसिंह पाटील, प्रसिद्ध उद्योगपती प्रवीण रणबागुल, सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले, प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, सहसचिव सुशील तौर, राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप देशमुख, कोहिनूर सय्यद,महिला प्रदेशाध्यक्ष सौ. झीनत सय्यद,जी.प.सदस्य संदिप मडके,उद्धव साळवी,मजूर फेडरेशन अध्यक्ष तात्यासाहेब गोरे,भूम पंचायत समिती उपसभापती बालाजी गुंजाळ, सावरगाव सरपंच रामेश्वर तोडकरी, तुळजापूर पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी गायकवाड, जिल्हाध्यक्ष सुजीत हंगरगेकर आदींची उपस्थिती होती.


सरपंच परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार कैलास पाटील म्हणाले की, गाव विकासाचा पाया हा सरपंच असतो सामाजिक दायित्व पत्करून सेवावृत्ती जोपासत कार्य करावे लागते,सर्वात कसरत अन काटेरी असते ती गाव सरपंच निवडणूक त्यामुळे गाव समस्या सोडवण्यासाठी दिवसरात्र काम सरपंच यांना करावे लागते.

यावेळी बोलताना सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी राज्यातील सरपंचाच्या समस्या व सरपंच मानधन वाढीबाबत आमदार कैलास पाटील यांना सभाग्रहात हा प्रश्न उपस्थित करून सरपंचांना त्यांच्या हक्काचे प्रश्न व न्याय देण्यासाठी विनंती केली.यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष धीरज पाटील,डॉ. प्रतापसिंह पाटील, ज्ञानेश्वर वायाळ,सौ.जिनत सय्यद आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.


 

उस्मानाबाद जिल्हा निवड 
सरपंच परिषद राज्य विस्तार मेळाव्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील नूतन पदाधिकारी यांना प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले,महिला प्रदेशाध्यक्ष सौ.जिनत सय्यद व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

मराठवाडा अध्यक्षपदी सतीश सोंने, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी सुजित हंगरगेकर, जिल्हा कार्याध्यक्षपदी बाळासाहेब जेवे, जिल्हा उपाध्यक्षपदी किरण व्हरकट, संजय असलकर, पंकज चव्हाण, सचिवपदी अशोक माने, उस्मानाबाद तालुकाध्यक्षपदी नितीन चव्हाण, भूम तालुकाध्यक्षपदी विशाल ढगे, परंडा तालुकाध्यक्षपदी रमेश कारकर, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी संजय गुंजोटे,उस्मानाबाद जिल्हा महिला अध्यक्षपदी सौ. प्रियंका रंगबागुल,जिल्हा कार्याध्यक्षपदी सौ. प्रिया बोराडे, जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीमती नगीनाताई कांबळे, उपाध्यक्षपदी सौ. रेश्मा गायकवाड, भूम तालुका अध्यक्षपदी सौ. प्रवीनी माळी,परंडा तालुका अध्यक्षपदी सौ. अनिता राऊत,तुळजापूर तालुकाध्यक्षपदी सौ.रेशमा घंटे,कळंब तालुका कार्याध्यक्ष सौ. ज्योती मुंडे, भूम तालुका कार्याध्यक्ष सौ.आयशा शेख, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष सौ. छाया डोलारे, भूम तालुका उपाध्यक्ष  सौ.अश्विनी वाघमोडे आदींची निवड यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.
 
Top