सलगरा, दि.२
समाजामध्ये डॉक्टरांचे योगदान फार मोलाचे आहे, मागील दोन वर्ष कोरोना संकटाशी लढताना डॉक्टरांच्या योगदानाचं, त्यांच्या सेवाभावी वृत्तीचं प्रकर्षाने सार्यांना महत्त्व पटलं आहे. त्यामुळे या 'राष्ट्रीय डॉक्टर्स डे' निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणार्या प्रत्येकाला सलाम करत त्यांच्या कार्याप्रती धन्यवाद म्हटलं जातं.
त्याच पार्श्वभूमीवर रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातुन प्रा.आरोग्य केंद्राच्या प्रांगणात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मुलाणी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपण करून झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला.
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. हि बाब लक्षात घेत, रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला होता. या साठी संतराम लोमटे वरिष्ठ महाविद्यालय व ग्रामपंचायत सलगरा (दि.) यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.
या वेळी नेत्र तज्ञ एन.डी.बंडगर, सुतकर , पुजा मिटकरी, अनिता अंधारे, एस.डी.भालेराव तसेच रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे सदस्य अर्जुन वाघमारे, विशाल केदार, कुणाल लोमटे, प्रतिष्ठानचे सोशल मीडिया प्रमुख प्रतिक भोसले यांच्या सह महाविद्यालयाचे प्रा. डॉ.संदीप कोरेकर, अजित लोमटे, संदीप लोमटे, सुनील आंदगावकर, योगेश कुठार, रमेश कांबळे आदी उपस्थित होते.