तुळजापूर , दि .२ :
सबंध महाराष्ट्रातील भावसार समाजासाठी श्रद्धास्थान असलेले तुळजापूर येथील गोवर्धन हे प्राचीन व ऐतिहासिक परंपरा जपणारा मठ म्हणून सुप्रसिद्ध आहे.श्री तुळजाभवानीचे भावसार समाजातील अनेक भक्तगण पूर्वापार इतिहास काळापासून अरण्य गोवर्धन मठामध्ये आराधना करण्यास व वास्तव्यास राहत असत व आजही ही परंपरा सुरू आहे. गोवर्धन मठासाठी मठाधीश म्हणून यापूर्वीही करवीर पीठ शंकेश्वर येथील आद्य शंकराचार्य महंत महंतांची नेमणूक केली आहे. याचाच भाग म्हणून जगद्गुरु शंकराचार्य महाराज शंकेश्वर करवीर पीठ यांनी दि. १ जुलै रोजी अरण्य गोवर्धन मठास भेट देऊन संपूर्ण पाहणी केली.
तसेच पारंपारिक रितीनुसार व कायदेशीर पद्धतीने श्री चेतन खोले यांची आरणे गोवर्धन मठाधीश म्हणून नेमणूक केलेल्या पत्राची पाहणी करून दत्त आरण्य गुरु शिवा अरुण बुवा असे नामकरण करून गादीवर बसवले.
याप्रसंगी भावसार समाजातील अनेक भक्तगण महाराष्ट्रातून उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत तुळजापूर येथील भावसार समाजातील दयानंद हिबारे , सुधीर शेळके, प्रताप आकुडे, महेश खुरुद ॲड शांतीवीर महिंद्रकर , खोले परिवार , प्रमोद चिंचोली मधुकर शेळके , अमर माळवदकर , योगी गुज्जर , मिलिंद चांडक , अमर शेळके , राजकुमार हिबारे , धनंजय हिबारे, लक्ष्मीकांत सरवदे , अंबादास माळवदकर, यांनी केला.
याप्रसंगी सोलापूर येथील रमाकांत भिसे, शिवाजीराव शेळके , अशोक क्षीरसागर हे उपस्थित होते. पारंपारिक पद्धतीने महंतांनी पूजा , आरती करून जगद्गुरु शंकराचार्य यांचे आशीर्वाद घेतले व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता झाली.