चिवरी, दि . ३ : 
 तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील  प्रादेशिक परिवहन अधिकारी पोपटराव पाटील, सैन्य  दलामध्ये पस्तीस वर्षे प्रदीर्घ सेवा केलेले गोविंद बिराजदार, तसेच यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तुळजापूर येथील वरिष्ठ लिपिक अर्जुन मुळे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त ग्रामस्थांच्यावतीने व ग्रामपंचायतच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. 


यावेळी सरपंच अशोक घोडके, उपसरपंच बालाजी पाटील, पोलीस पाटील रुपेश बिराजदार, प्राध्यापक प्रमोद मुळे, विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी शिंदे ,माजी नगरसेवक अविनाश गंगणे, संदीप गंगणे, कमलाकर सूर्यवंशी ,तानाजी पाटील, अनिल गायकवाड, प्रभाकर बिराजदार,आदीसह शिक्षक कर्मचारीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावातील व बाहेर गावावरून आलेल्या मान्यवरांनी पण सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच अशोक घोडके,उपसरपंच बालाजी पाटील,प्रा. प्रमोद मुळे, प्रा.बाबुराव शिंदे, अनिल गायकवाड, चेरमन-बालाजी शिंदे, पोलीस पाटील-योगेश बिराजदार, बलभीम मनशेट्टी, तानाजी पाटील,आदीनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज भुजबळ  यांनी  तर आभार अनिल गायकवाड  यांनी मानले.

 
Top