तुळजापूर, दि. 2 : 


केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाने सर्वत्र महागाईचा भडका उडाला असून पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, अन्न, भाजी पाला अशा जिवनावश्यक प्रत्येक वस्तूचे भाव वाढ झाल्याने देशातील सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. या पार्श्वभुमिवर प्रचंड महागाई व इंधन दरवाड करणाऱ्या मोदी सरकारचा जाहिर निषेध करुन तुळजापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तहसिलवर मोर्चा काढण्यात आला.


सर्वसामान्य जनतेचे हाल होत असताना केंद्र सरकार लक्ष देण्यास तयार नाही, केंद्र सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार  यांच्या आदेशानुसार तुळजापूर येथे मोर्चा काढण्यात आला. तुळजापूर तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नियोजन  राष्ट्रवादी काँग्रेसचे  तालुका अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आले. 

 या मोर्चामध्ये राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते दिलीप मगर, माजी नगरसेवक धनंजय पाटील, तालुका संघटक बबन गावडे, खंडू जाधव, विधानसभा सदस्य दिगंबर खराडे, चांदपाशा नदाफ, बाबुलाल शेख शहर अध्यक्ष अमर चोपदार, युवक तालुका कार्याध्यक्ष शरद जगदाळे, जिल्हा युवक राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विवेक शिंदे, व्यापार तालुकाध्यक्ष आप्पा पवार, तालुकाध्यक्ष फेरोज पठाण, अल्पसंख्यांकचे तोफिक शेख,  जिल्हा युवक सरचिटणीस शशिकांत नवले, शहर अध्यक्ष (अल्पसंख्यांक विभाग) वाहेद शेख, राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष मकसूद शेख, बाळासाहेब चिखलकर समाधान धाकतोडे व पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top