तुळजापूर,  दि. 2 : 

तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे गुरुवार रोजी उमेद अतंर्गत जयक्रांती महीला गटाने गांडुळखत निर्मीती प्रकल्प उभारुन गांडूळ खत विक्रीसाठी तयार केला. व खताच्या विक्रीचा शुभारंभ जि.प.अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हास्ते करण्यात आला.

यावेळी तुळजापूर प. स. साहय्यक   गटविकास अधिकारी मोहन राऊत, तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती रेणुका इंगोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव, तालुका समन्वयक शेरखाने, अभीजीत पांढरे, ओमकार दिक्षीत, गणेश कुंभार, प्रभाग समन्वयक कल्पना भुरे, व काक्रबा प्रभाग अध्यक्षा सवीता सालपे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 


शेतकऱ्यांसाठी वरदान असलेल्या गांडुळ खताचे पोती बघुन उपस्थितीत पाहुण्यांनीं महीला गटाचे कौतुक केले. यावेळी जि.प.अध्यक्ष कांबळे, गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसंघाच्या अध्यक्षा सिंधुताई सुपनार, सचीव संध्या व्होर्टे, श्रीदेवी मगतराव, सुनीता क्ष‍िरसागर, लक्ष्मी कुंभार, राजश्री स्वामी, गुलशन शेख, सारीका सगर, गीरीजा सोनवणे, संजना जाधव रोहिणी सगर, सुरेखा सगर, चेअरमन बाबुराव ठोंबरे, शहाजी सुपनार, भास्कर सगट, संतोष मस्के, यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.
 
Top