नळदुर्ग दि . २
नळदुर्ग शहरात हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील वसंतराव नाईक चौकात जिल्हा परिषद सदस्य माजी सभापती प्रकाश चव्हाण यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुनील चव्हाण बाजार समितीचे माजी संचालक हरीश जाधव ओबीसी शहराध्यक्ष वैभव जाधव नगरसेवक निरंजन राठोड नगरसेविका छमाबाई राठोड विलास राठोड,देविदास राठोड,लक्ष्मण चव्हाण विमुक्त भटक्या जाती चे उपाध्यक्ष कैलास चव्हाण माजी नगरसेवक रामजी राठोड डॉक्टर सुभाष राठोड, लक्ष्मण राठोड बालाजी राठोड ,दत्ता राठोड ,एमपी राठोड ,गोर सेनेचे तालुकाध्यक्ष राजू चव्हाण , उपाध्यक्ष लखन चव्हाण, सचिव कुमार राठोड ,सुरेश राठोड शरणाप्पा कबाडे , दादा चौधरी, सुधीर राठोड ,अशोक जाधव, आकाश जाधव ,विनायक जाधव ,शिवाजी चव्हाण, विशाल जाधव रवि महाराज , यांच्यासह बंजारा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.