मुरूम, दि. २ :
येणेगूर, ता. उमरगा येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाहतूक नियंत्रक राजपूत यांना बसस्थानकात बसेस थांबवण्यात याव्यात यासाठी निवेदन देण्यात आले.
सदर बसस्थानक करोडो रुपये खर्च करून बांधण्यात आलेली इमारत आज धूळ खात पडलेली असून वाहतूक नियंत्रकांना सुद्धा बाहेर थांबून सर्व बसेसची नोंद घ्यावी लागत आहे. वृद्ध, अपंग, ज्येष्ठांना रस्त्यावरच जीव मुठीत घेऊन, अस्वच्छ जागेत बसची वाट पाहत तासनतास, उन्हा-तान्हात थांबावे लागत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी दि.२ रोजी विनंती अर्ज करण्यात आले. लवकरात लवकर प्रवाशांची सोय करावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर तालुका चिटणीस सागर पाटील, प्रसिद्धी प्रमुख विवेकानंद हंगरगे, महादेव मंगरुळे, संजय गाडेकर, महेश बिराजदार, ज्ञानेश्वर माने, आकाश पारधी यांनी सह्या केल्या आहेत.