काटी , दि. २ : उमाजी गायकवाड

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील  सुजित हंगरगेकर यांची गुरुवार दि.1 जुलै रोजी सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

    माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्म दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून उस्मानाबाद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात   सरपंच परिषद पुणे, महाराष्ट्र राज्य आयोजित बैठकीत सुजित हंगरगेकर यांची  सरपंच परिषदेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड  झाल्याचे नियुक्ती पत्र शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, शिक्षण महर्षी डॉ.प्रतापसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, राज्य परिषदेचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ यांनी दिले आहे.


ग्रामपंचायतीच्या सर्वांगिण विकासासाठी हि संघटना काम करत असून या संघटने मार्फत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचविण्याचा मुख्य हेतू आहे. या पत्रात  हंगरगेकर यांच्या निवडीने   सरपंच परिषदेच्या वाढीसाठी आपला जिल्हाध्यक्ष म्हणून महत्वाचा वाटा असणार असून या तुमच्या अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा लाभ संघटनात्मक वाढीसाठी उपयुक्त ठरेल असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 
सुजित हंगरगेकर यांचा सुसंस्कृत स्वभाव, त्यांची समाजात काम करण्याची पद्धत, संघटन कौशल्य, ग्रामपंचायतीमध्ये केलेल्या विकास कामांचा अनुभव, अडचणीत असलेल्या लोकांना मदतीला धावून जाणे, गावात केलेली सार्वजनिक कामे, विविध विकासात्मक कामासाठी सतत प्रशासनाकडे केलेला पाठपुरावा या कामांची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. 

ग्रामपंचायत सदस्य ते जिल्हा कॉंग्रेस कमिटी सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ते माजी आमदार तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची समाजामध्ये ओळख  असल्याने सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील सरपंच, उपसरपंच, यांची मजबूत फळी तयार करून ग्रामीण भागात केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या योजना  ग्रामपंचायतमध्ये  राबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याने सुजित हंगरगेकर यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
         

या प्रसंगी शिवसेनेचे आमदार कैलास पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. धिरज पाटील, सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, महिला प्रदेशाध्यक्षा जिनत सय्यद, शिक्षण महर्षी डॉ. प्रतापसिंह पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, उद्योजक प्रविण रणबागुल, जि.प. सदस्य संदीप मडके, उध्दव साळवी, सुशिल तौर, माजी पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, संदीप देशमुख, पंढरी शिंदे, शत्रुघ्न कणसे, सावरगावचे सरपंच रामेश्वर तोडकरी, जिल्हा उपाध्यक्ष किरण व्हरकट, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब जेवे, सतीश सोन्ने, गौरीशंकर नकाते, गौरीशंकर कोडगिरे, सुहास साळुंके, भैरी काळे, चंद्रकांत काटे,करीम बेग,  अविनाश वाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
 
Top