भारतीय स्टेट बँकेच्या ६६ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दि .१ जुलै रोजी लोहारा शहरात १५० वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.
वृक्ष लागवड आणि वृक्ष संगोपणातून शहरातील तापमान नियंत्रणात तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मोलाची मदत होणार आहे.यासाठीच भारतीय स्टेट बँकेने वर्धापन दिनानिमित्त शहरात वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडिया लोहारा शाखा व्यवस्थापक प्रसाद कांबळे यांनी दिली. शहरातील तहसील कार्यालय,औद्योगिक प्रशिक्षण महाविद्यालय,ग्रामीण रुग्णालय आदी परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी तहसीलदार संतोष रुईकर, नगरपंचायत मुख्याधिकारी गजानन शिंदे,ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ गोविंद साठे, वजीर अत्तार,एस बी माळी,वजीर मणियार,शाखा उपव्यवस्थापक विशाल वर्णे, निखिल लिमजे,आशिष बाराते,यांच्यासह बँक कर्मचारी दिनेश गरड,अभिजात कांबळे, पप्पू बिराजदार, विकास थोरात,बाळू कांबळे उपस्थित होते.