काटी दि . २ : उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील जळकोटवाडी येथील प्रगतिशील द्राक्ष बागायतदार तथा कृषी भुषण पुरस्कार प्राप्त शेतकरी त्रिंबक फंड यांचे चिरंजीव संजय फंड व वैभव फंड या बंधूंच्या सावरगाव येथे बसस्थानक शेजारी शुक्रवार दि.2 जुलै रोजी सकाळी दहा वाजता आर्या ॲग्रो एंटरप्रायजेस या कृषी दुकानाचा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात शुभारंभ करण्यात आला.
या दुकानाचा उद्घघाटन जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकपर भाषणात बोलताना विशाल सुर्यवंशी यांनी आर्या ॲग्रो एंटरप्रायजेसची माहिती सांगून सावरगाव परिसरात द्राक्ष बागायतीचे क्षेत्र वाढले असून सावरगावसह परिसरातील शेतकऱ्यांना शेतीविषयक उत्तम माहिती असणारे कृषी भूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी त्रिंबक फंड यांच्या मार्गदर्शनाचा या दुकानामुळे चांगला फायदा होणार असून संजय व वैभव फंड या बंधूंनी सुरू केलेल्या आर्या ॲग्रो एंटरप्रायजेस या दालनात सावरगावसह परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती व मार्गदर्शनासह सर्व प्रकारची खते, बी-बियाणे, औषधे हे एकाच छताखाली मिळणार असल्याने शेतकऱ्यांसाठी हे कृषी दुकान सोयीचे ठरणार असल्याचे सांगितले.
तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करताना आर्या ॲग्रो एंटरप्रायजेसचे सर्वेसर्वा त्रिंबक फंड म्हणाले की, आर्या ॲग्रो एंटरप्रायजेसच्या माध्यमातून सावरगावसह परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी, द्राक्ष बागेसाठी लागणारे नामांकित कंपनीचे बी-बियाणे,औषधे,खते असे सर्व साहित्य उपलब्ध राहणार असून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती पद्धतीकडे वळून शेती हाच प्रमुख व्यवसाय समजून व्यवसायिक पध्दतीने शेती करुन उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आर्या ॲग्रो एंटरप्रायजेसच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेवा देणे हेच आमचे ध्येय असून केवळ वस्तू विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन उत्तम लाभ शेतकऱ्यांना करुन देऊ असा विश्वासही त्यांनी दिला.
या उद्घघाटन प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजकुमार पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, सरपंच रामेश्वर तोडकरी, प्रगतिशील द्राक्ष बागायतदार त्रिंबक फंड, संजय फंड, वैभव फंड, लक्ष्मण जगताप,हणमंत गवळी, महेश स्वामी, जळकोटवाडीचे सरपंच, गणेश डोलारे, महादेव वडणे, राजाभाऊ फंड,मोहन भोसले, पोलीस निरीक्षक बालाजी साळुंके, रामराव भोसले, द्राक्ष निर्यातदार हेमंत मेंढे, विशाल सुर्यवंशी, हर्षल अवताडे, तानाजी मेंडके, सुभाष शेंडगे, युवराज खोपडे, शंकर शिंदे, हरि कदम, नागनाथ घोडके, रमेश काडगावकर, रमेश फंड, जीवन फंड, संजय लिंगफोडे, प्रमोद माने , विशाल माने, अमर माने , भैय्या कुलकर्णी,श्रीकांत वडणे,दत्तात्रय फंड,आबाराव फंड, शंकर फंड,सुरज ढेकणे, बाळासाहेब डोके,आदीसह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल सुर्यवंशी यांनी तर आभार त्रिंबक फंड यांनी मानले.