नळदुर्ग , दि . 1 
हरित क्रांतीचे प्रणेते  दिवंगत मुख्यमंत्री वंसतराव नाईक  यांची जयंती , एसबीआय बॅकेचे वर्धापन दिन, डॉक्टर डे  दिनाचे औचित्य साधुन  एसबीआय  फाऊंडेशन मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या समन्वयाने नळदुर्ग येथिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह याठिकाणी  30 बेडच्या नविन कोविड सेंटरचे उद्घाटन जि.प. अध्यक्षा  अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.



या सेंटरमध्ये 10‍ ऑक्सिजन कॉन्सीटेरसह आवश्यक असणाऱ्या आरोग्यविषयक परिपूर्ण साहित्य सेंटरला देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वस्तीगृह याठिकाणी  प्रशासन व लोकसहभागातुन  70 बेडचे कोविड सेंटर उभे करण्यात आले आहे. नळदुर्ग परिसरातील ग्रामीण भागाचा विचार केला असता याचा विस्तार करण्याच्या  दृष्टीने एसबीआय फाऊंडेशन  मुंबई व दिलासा जनविकास प्रतिष्ठान, औरंगाबाद यांच्या समन्वयाने गेल्या तीन वर्षापुर्वी पासुन ग्रामसेवा कार्यक्रमांतर्गत येडोळा ,  रामनगर , जकणी तांडा , गायरान तांडा , रामतिर्थ , या पाच गावात  विविध विकास कामे चालु आहेत. त्यामुळे वरिल संस्थेने 30 बेडचे नविन कोविड सेंटर उभे केले. 

यामध्ये 10 ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन ,9 हजार 500 मास्क , 60 बेडसिट , 30 बेडच्या गादया, उशी , सॉनिटायझर , रॉपिड ॲन्टिजन टेस्टिंग किट्स , आवश्यक  औषाधासह अनेक  टेस्टिंग किट, साबण, तेल, बकेट, टॉवेल,  व इतर साहित्य असे  परिपुर्ण सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी कृर्षी दिनानिमित्त दिवंगत मुख्यमंत्री वंसतराव नाईक  यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवराच्या हास्ते करून आभिवादन करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्याचबरोबर  डॉक्टर " डे " दिनानिमित्त  सर्व आरोग्य कर्मचा-याचे सत्कार करण्यात आले.  यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. हणमंत वडगावे  यानी बोलताना म्हणाले की, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर  नसुन हे कित्येकजणाचे प्राण आहे. असे सांगुन फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले.

उस्मानाबाद जिल्हयामध्ये ऑक्सिजन आभावी अनेकाना आपला प्राण गमवावा लागला. एसबीआय फाऊंडेशन  व दिलासा प्रतिष्ठाणने ऑक्सिजन कॉन्सीटेरसह रूग्णासाठी सर्व आवश्यक परिपुर्ण औषधे , सोयी सुविधा उपलबध करून दिल्याने ग्रामीण भागातील कित्येकाचे प्राण वाचणार  असुन या अनमोल सहकार्याबद्दल गौरव उदगार  जि. प. सदस्य  सौ. अस्मिता कांबळे यानी अध्यक्षीय समारोप प्रंसगी काढले.


या कार्यक्रमास   जि.प. सदस्य प्रकाश चव्हाण, पंचायत समिती सभापती रेणूका इंगोले, सहाय्यक गटविकास अधिकारी मोहन राऊत , एसबीआयचे शाखाधिकारी निर्माण पारकर, पशूसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव , डॉ. माधव सादगिरे,  नळदुर्गचे वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल जानराव , दिलासाचे  विलास राठोड, प्रणव उन्हाळे, रंजना राठोड, भूषण पवार, हरिष जाधव, वैभव जाधव, येडोळाचे सरपंच पद्माकर पाटिल, रामतिर्थ चे सरपंच बालाजी राठोड, श्रीमंत राठोड, दिनेश राठोड, आजित पवार, विनायक राठोड, नगरपरिषदचे कार्यालयीन अधिक्षक लक्ष्मण कुंभार, कर्मचारी मुनीर शेख, निळकंठ राठोड,  संगम चव्हाण, विश्वनाथ चव्हाण  नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, कोविड सेंटरचे कर्मचारी पत्रकार विलास येडगे, शिवाजी नाईक, प्रा. पाडुरंग पोळे, दादासाहेब बनसोडे, लतीफ शेख आदीची प्रमुख उपस्थिती होती.


 आरोग्य   विभागाच्या  डॉ. अंकाक्षा गोरे, डॉ. नारायण घुगे,  डॉ. स्मिता कुंटे , व्यकंटेश घुगे,  परिचारिका बालिका कोकाटे,  कविता राठोड , रेखा गायकवाड, मनिषा सरवदे, अनिल राठोड, शिवाजी गायकवाड  आदि कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भुषण पवार  , प्रास्ताविक विलास राठोड तर आभार सुनिता करदुरे यांनी मानले.


या कार्यक्रमात ऑनलाईन एसबीआय 
फाऊंडेशनचे प्रेसिडेंट ललित मोहन , प्रकल्प व्यवस्थापक राजाराम चव्हाण दिलासाचे सचिव संजीव उन्हाळे, संचालिका वैशाली खाडिलकर आदी उपस्थित होते
 
Top