तुळजापूर, दि . ३० : डॉ.सतीश महामुनी
२५ जून १९७५ रोजी आपल्या देशात आणीबाणी घोषित केली. त्यात व्यक्ती स्वतंत्र्यावर गदा आणली होती. त्यानंतर व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहावे, यासाठी देशभर आंदोलन झाले या देशव्यापी आंदोलनात तुळजापूर शहरातील श्रीमती रुक्मिणी हरिभाऊ गवते (वेताळ नगर) प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले होत्या.
श्रीमती रुक्मिणी गवते यांचे या आंदोलनातील सहभागाचे कार्य लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुळजापूर तालुक्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणीबाणीच्या काळात आंदोलनात सहभागी झालेल्या आणि कारावास भोगलेल्या आंदोलनात सहभागी व्यक्तीचा तुळजापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सचिन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी तुळजापूर सचिन पाटील, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष दिनेश बागल, युवा मोर्चाचे नेते राम चोपदार यांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. सत्कारच्या कार्यक्रमात सत्याग्रही सदस्यांनी आपले त्यावेळचे दुःख व्यक्त केले आणि त्यांच्या हक्काच्या मागण्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत, आयुष्याच्या शेवटपर्यंत संघर्ष करण्याची आणि हालअपेष्टा सहन करण्याचे परिसीमा गाठलेली आहे . त्यामुळे आणीबाणी भोगलेल्या सर्व कुटुंबांना ज्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा आमदार पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती याप्रसंगी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
आणीबाणीच्या काळात या कार्यकर्त्यांनी भोगलेला त्रास ,तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण झालेली विदारक अवस्था अनौपचारिकपणे सत्कारानंतर सांगितले. मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलन कर्त्याच्या योगदानाबद्दल कृतघ्नता व्यक्त केली. या अनुभवाबद्दल युवा मोर्चाचे नेते राम चोपदार यांनी वेगवेगळ्या राजकीय कार्यक्रमापेक्षा आणीबाणीतील योगदान देणाऱ्या या व्यक्तींचा सत्कार मला व्यक्तिशः मोलाचा वाटला असे सांगितले.