अणदूर , दि . १६ :
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील जवाहर कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना करण्यात आली. येथील जवाहर महाविद्यालयात 'नॅक ' अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेतील नूतन पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संघटनेचे अध्यक्ष प्रा.डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
महाविद्यालयातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाशी कायम संपर्क करावा व त्यांच्या ज्ञानाचा, पदाचा व अनुभवाचा वर्तमान विद्यार्थ्यांना लाभ व्हावा याकरिता माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात आली असून संघटनेमार्फत कार्यान्वित होणाऱ्या विविध उपक्रमाच्या माध्यमातून बदललेले संदर्भ लक्षात घेऊन शिक्षण प्रक्रिया बदलण्याच्या दृष्टीने विदयार्थी हितासाठी विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाविद्यालयाशी शैक्षणिक समन्वय साधण्यासाठी सदर बैठकीमध्ये निवडण्यात आलेल्या कार्यकारणीमध्ये माजी विद्यार्थी संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या उर्वरित कार्यकारणीमध्ये रेवणसिद्ध आंधळकर (कार्याध्यक्ष ), प्रा. संतोष नरे ( उपाध्यक्ष ) ,डॉ. विश्वास माने ( सचिव ), प्रा.ज्योती हत्तरगे ( कोषाध्यक्ष ),शैलजा बिरादार ( संचालक ), लक्ष्मी पाटील ( संचालक ), विक्रम आलुरे ( संचालक ), सोनाली जाधव ( संचालक ) ,सुभाष गळाकाटे ( संचालक ) डॉ. रामकृष्ण कदम ( संचालक ) सुषमा बिराजदार ( संचालक ) गोविंद घंटे ( संचालक ),भैरवनाथ कानडे ( संपादक ) प्रा. डॉ. मल्लिनाथ बिराजदार ( समन्वयक )आदींचा समावेश आहे.
यावेळी चनशेट्टी यांनी नोंदणीकृत करून कार्यान्वित करण्यात येणाऱ्या माजी विद्यार्थी संघटनेची भूमिका व कार्य पद्धती याबाबत माहिती दिली. तर पुढील काळात उपक्रमशील स्वरूपाच्या रचनात्मक कार्यातून संघटनेला अधिक बळकट करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करण्याचे अभिवचन देत प्रा. संतोष नरे ,रेवणसिद्ध आंधळकर, प्रा. डॉ. विश्वास माने, भैरवनाथ कानडे ,सुषमा बिराजदार यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ मल्लिनाथ बिराजदार यांनी प्रास्ताविकासह उपस्थितांचे आभार मानले.