लोहारा ,दि . १५ : 

  शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये सिमेंट रस्ते व रस्ता मजबुतीकरणाची अनेक कामे न झाल्याने या भागातील नागरिकांना चिखलातून  वाट काढत जावे लागत असल्याने मोठी गैरसोई होऊन त्रास सहन करावा लागत होता. 

ही बाब लक्षात घेऊन दयानंद स्वामी व त्यांच्या वडिलांनी सामाजिक बांधीलकी म्हणून स्वखर्चातुन खडक (मुरुम) विकत घेत रस्ता खराब असलेल्या ठिकणी रस्त्यावर टाकुन तात्पुरता स्वरूपात का होईना रस्ता दुरुस्त केला आहे.

 शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये तत्कालीन नगरसेवक व नगर पंचायत प्रशासनाने इतर प्रभागाप्रमाणे सिमेंट रस्ते, गटारी, रस्ता मजबुती करणाची कामे करून घेणे आवश्यक असतानाही याकडे स्थानिक न.पं. प्रशासनाकडून व तत्कालीन नगरसेवकांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात रस्त्यावर चिखल होत असल्याने गाडीवर तर काय साधे रस्त्यांवरून चालणेही मुस्किल झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन दयानंद स्वामी व त्यांच्या वडिलांनी स्वखर्चातुन ट्रॅक्टरमधून खडक (मुरूम) विकत घेत स्वतःच खराब रस्ता असलेल्या ठिकाणी खडक टाकण्यात आले आहे. या स्तुत्य उवक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

लोहारा नगर पंचायतची निवडणूक कांही महिन्यावर येऊन ठेपली असून असे असतानाही नगर पंचायतचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.  प्रभागात येण्या व जाण्यासाठी मजबूत किंवा सिमेंटचा रस्ताच उपलब्ध नसल्याने नागरिकांना चिखल तुडवीत घराकडे जावे लागत आहे. हा रस्ता दुरुस्त करावा यासाठी नागरिकांनी नगर पंचायत व नगरसेवक यांच्याकडे वारंवार करूनही जाणूनबुजून दुर्लक्ष करण्यात आले. चिखलमय रस्त्यातून जाताना कधी दुचाकी, चार चाकी, गाडी फसने, घसरून पडणे, यासह अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगर पंचायत रस्ता दुरुस्ती करत नाही म्हणून खचून न जाता स्वामी पिता पुत्रांनी एक सामाजिक बांधिलकी जोपासत मुरुम टाकून रस्ता तात्पुरता स्वरूपात का होईना दुरुस्त केला आहे. त्यामुळे आता नगर पंचायत प्रशासन स्वतःहून तरी शहरातील खराब रस्ते असलेल्या ठिकाणी रस्ता दुरुस्ती करणार का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 
Top