तुळजापूर दि १६ डॉ. सतीश महामुनी
आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या रोटरी क्लब तुळजापूरच्या अध्यक्षपदी तुळजापूरचे उद्योजक रामचंद्र गुड्डे तर उद्योजक स्वप्निल कुलकर्णी यांची सचिवपदी निवड झाली आहे.
२०२१-२२ साठी रोटरीच्या पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष रामचंद्र भिडे हे तुळजापूर तालुक्यातील आरळी बुद्रुक येथील रहिवासी आहेत.
रोटरीचे ज्येष्ठ सदस्य आप्पासाहेब पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला, याप्रसंगी कुंदन कोंडो, विष्णू अंबर, अनिल रोचकरी, सुजित नाईक, डॉ. कार्तिक यादव, डॉ. मकरंद बाराते, ॲड. स्वाती नळेगावकर, सदानंद राव, भरत जाधव, संजय जाधव, संजय मैंदर्गी, कुंदन धुमाळ, सुधीर शेळके आदी उपस्थित होते.
आरळीच्या सुपुत्राची रोटरीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने गावचे सरपंच गोविंद पारवे, उपसरपंच किरण व्हरकट, सहाय्यक फौजदार संजय पारवे, आरळी बुद्रुक महोत्सव समितीचे अध्यक्ष सुनील पारवे, उपाध्यक्ष धैर्यशील नारायणकर, सचिव भीमराव पारवे,छावाचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी आदींनी अभिनंदन केले आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष रामचंद्र गिड्डे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मागील तीस वर्षापासून तुळजापूर येथे उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटवला असून अनेक वर्षापासून ते रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्य करतात ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाला प्रथमच रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली आहे