नळदुर्ग , दि . १५
शहरातील फिनो पेमेंट्स बँकेच्यावतीने गुरूवार दि . 15 जुलै रोजी डोळे स्कॅन वरुन आधारव्दारे पैसे काढण्याच्या मशिनचे शुभांरभ करण्यात आले .
यावेळी उपस्थिताना सॅनिटायझर, मास्क वाटप, करण्यात आले. तसेच फिनो बँकेच्या सुविधा सहज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकींग आऊटलेटची माहिती देण्यात आली. बॅकेच्या सुविधा आधार कार्ड वर पैसे काढणे, पैसे पाठवणे , एटिएम सहित त्वरित खाते उघडण्याकरिता बॅकेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी आरंभ सामाजिक संस्थेचे श्रमिक पोतदार, पंकज हजारे, महेंद्र काळे, केवल पाटील, गोरख घोडके, आकाश डुकरे, रत्नाकर घोडके, फिनोचे अधिकारी आकाश जाधव आदी उपस्थित होते.